
सावंतवाडी : शहरात श्री गणेश फोटो स्टुडिओ यांची दुसरी शाखा ''श्री गणेश डिजिटल मिडीया प्रिंटींग'' या नावाने हॉटेल मॅगो जवळ, कोरगांवकर बुक स्टॉल समोर नव्याने सुरू होत आहे. रविवार दि. १४ जुलै २०२४ रोजी सायं. ५ वाजता 'श्री गणेश डिजिटल मिडिया प्रिंटींग' या नव्या दालनाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी उपस्थित रहाण्याचे आवाहन कोरगावकर कुटुंबिय व श्री गणेश फोटो स्टुडिओ आणि डिजीटल लॅब कडून करण्यात आलं आहे.
गेल्या तिनं दशकांहून अधिक काळ श्री गणेश फोटो स्टुडिओ आणि डिजीटल लॅबच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार सेवा दिल्यानंतर दुसरी शाखा श्री गणेश डिजिटल मिडीया प्रिंटींग या नावाने सुरू होत आहे. येत्या रविवारी १४ जुलै २०२४ रोजी सायं. ५ वा. स्नेह नागरी पतसंस्था, सावंतवाडी चेअरमन अनंत उचगांवकर यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी भास्कर (नाना) देऊलकर, रवींद्र प्रभूदेसाई, प्रसाद सातार्डेकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हॉटेल मॅगो जवळ, कोरगांवकर बुक स्टॉल समोर सुरू होणाऱ्या श्री गणेश डिजिटल मिडीया प्रिंटींग शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहाव असं आवाहन गणेश फोटो स्टुडिओचे सर्वेसर्वा सुनिल कोरगांवकर, सौ. स्मिता सुनिल कोरगांवकर, गणेश चोकोबाईटस्टचे सुरज सुनिल कोरगांवकर व सौ. ज्योती कोरगांवकर यांनी केल आहे.
या नव्या दालनात बॅनर प्रिंटीग, व्हिनेल प्रिंटींग ग्लॉसी/मॅट, कॅनवास प्रिंटींग, वनवे व्हिजन प्रिंटींग, जम्बो झेरॉक्स (कलर/ब्लॅक & व्हाईट), बॅक लाईट प्रिंटींग, एन्लार्जमेंट फोटो प्रिंन्ट, फोटो आणि डॉक्यूमेंट लॉमिनेशन, लग्नपत्रिका प्रिंटींग, टि शर्ट प्रिंटींग,मोबाईल कव्हर प्रिंटींग, मग, किचैन प्रिंटींग, पिलोज कव्हर प्रिंटींग, LED फोटो फ्रेम, ऍक्रेलिक फोटो फ्रेम, ऍक्रेलिक, वुड, ग्लास फोटो प्रिंटींगसह सर्व गिफ्ट प्रॉडक्ट प्रिंट करुन मिळणार आहेत.