कर्ली नदीवरील पुलाचं लोकार्पण...!

Edited by: भरत केसरकर
Published on: January 28, 2024 06:53 AM
views 296  views

कुडाळ : माणगाव खोऱ्यातील दुकानवाड येथील पूर्ण झालेल्या कर्ली नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा आणि माणगाव खोऱ्याला जोडणारा  केनेडी उपवडे कडावल वाडोस शिवापुर शिरशिंगे हा सह्याद्री मार्ग १९० या रस्त्याचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला.

 या रस्त्यावरील पहिल्या टप्प्याचे डांबरीकरण होणार असल्याने व माणगाव खोऱ्यातील उपवडे येथील कर्ली नदीवरील उंच पातळीच्या पुलाचा लोकार्पण  सोहळ्यासाठी चार कोटी पंधरा लाख एवढा निधी खर्च करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, भाजप सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, राजू राऊळ, संध्या तेरसे, दिपलक्ष्मी पडते, भाजपा कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, मोहन सावंत,  दादा बेळणेकर राजा धुरी ,भाई बेळेणेकर ,पप्या तवटे, दिलीप सावंत ,सरपंच दीप्ती सावंत, संजना म्हाडगुत, उपसरपंच संजय म्हाडगुत ,सुरज कदम, संदीप म्हाडगुत, शिवापूर सरपंच स्मिता शेडगे, बड्या सावंत ,केशव भरतू,दत्ता कोरगावकर, आदि उपस्थित होते