जिल्हा बँक तळेबाजार शाखेच्या ATM चे नितेश राणेंच्या हस्ते आज उद्घाटन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 17, 2023 12:04 PM
views 173  views

देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तळेबाजार शाखा नविन एटिएम चे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुरूवार दि.१७ऑगस्ट २०२३ रोजी सायं. ५.००वा. करण्यात येणार आहे.

उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, माजी आमदार तथा बँकेचे माजी संचालक अजित गोगटे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँक संचालक प्रकाश बोडस आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. सदर सोहळ्यास गावातील ग्रामस्थ, ग्राहक, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असा आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्य अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले आहे.