श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये संगणक शास्त्र विभागाच्या अद्ययावत संगणक लॅबचे उद्घाटन

Edited by: विनायक गावस
Published on: October 31, 2023 13:28 PM
views 114  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे संगणक शास्त्र विभागाच्या अद्यावत संगणक लॅब चे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त युवराज्ञी उर्वशीराजे भोंसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी  युवराज्ञी उर्वशीराजे भोंसले यांना   वाढदिवसानिमित्त सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले,  युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोंसले, सौ.अनुराधा घोरपडे,सौ.प्रिया घोरपडे बेंगलोर , संस्थेचे संचालक प्रा. डी. टी .देसाई सहसंचालक अॅड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल,आय क्यु ए.सी. समन्वयक डाॅ. बी.एन. हिरामनी,संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा.सौ. विभा गवंडे, प्रा. प्रणाम कांबळी, प्रा.आदीत्य  वर्दम, प्रा. गायत्री आवटे, प्रा. तन्वी शिंदे, सिद्धिविनायक सावंत श्रीमती माधवी नाईक  महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 32 संगणक,इंटरनेट व्यवस्था असलेल्या या लॅबमुळे विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी उपलब्द झालेली आहे. या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले यानी या  प्रसंगी केले.