नितेश राणेंच्या निधीतून कणकवलीत एसटी प्रवासी निवारा शेडचं लोकार्पण..!

मुंबईच्या धर्तीवर निवारा शेडची उभारणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 08, 2023 18:54 PM
views 186  views

कणकवली : आ. नितेश राणे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कणकवली नरडवे नाका या ठिकाणी एसटी प्रवाशांसाठी प्रवासी निवारा शेडचे लोकार्पण आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. गेले अनेक वर्षे या ठिकाणी निवारा शेड होती. मात्र, तिची दुरावस्था झाली होती.

आता मुंबईच्या धर्तीवर आकर्षक व मजबूत अशा एसटीची निवारा शेड चे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक मेघा गांगण, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, अभिजीत मुसळे बंडू गांगण, शहराध्यक्ष आण्णा कोदे, प्रकाश सावंत, संतोष पुजारे, बंडू राणे, संजय मालडकर, संजय ठाकूर आदि उपस्थित होते.