श्री देवी माऊली संगणकीय सुविधा केंद्राचा शुभारंभ !

प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: विनायक गावस
Published on: January 03, 2023 16:20 PM
views 186  views
हायलाइट
गोगटे मिनरल्स, फोमेंतो रिसोर्सीसचा उपक्रम

सावंतवाडी : गोगटे मिनरल्स व फोमेंतो रिसोर्सीसच्या माध्यमातून तिरोडा गावात श्री देवी माऊली संगणकीय सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या संगणकीय केंद्राचा शुभारंभ सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी यांनी गावातील लोकांना संगणकीय सुविधा गावातच उपलब्ध करून दिल्याबद्दल गोगटे मिनरल्स व फोमेंतो रिसोर्सीसचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. 



श्री देवी माऊली संगणकीय सुविधा केंद्राचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. प्रांताधिकारी यांच्या हस्ते संगणकीय कामाकाजास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर कल्पवृक्षाची रोपे मान्यवरांच्या हस्ते परिसरात लावण्यात आली.  याप्रसंगी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी गोगटे मिनरल्स व फोमेंतो रिसोर्सीसच्या उपक्रमाचे कौतुक केले. प्रांताधिकारी यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे गोगटे मिनरल्स, फोमेंतो रिसोर्सीसकडून आभार व्यक्त करण्यात आले. ‌



दरम्यान, या संगणकीय केंद्रामुळे गावातील लोकांना आता संगणकीय सुविधांकरीता गावाबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले. याप्रसंगी मिनरल रिसोर्सेस हेड महाराष्ट्र नारायण प्रसाद, तिरोडा सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच  संदेश केरकर, फोमेंतो रिसोर्सिसचे प्रमोद सरोदे, धर्मेंद्र पवार, चंद्रकांत पाटील, पुरूषोत्तम नायडू, पी. श्रीनिवास, ग्रामपंचायत सदस्य वृंदावनी गावडे, भास्कर गोडकर, विश्रांती साळगावकर, रत्नाकर आराडकर, दर्शना मातोंडकर, श्री. विकी सावंत आदी उपस्थित होते.