
वैभववाडी : येथील अर्जुन रावराणे विद्यालय व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाचे आज उद्घाटन झाले. स्थानिक संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
रावराणे विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाला आज प्रारंभ झाला. यामध्ये विविध मैदानी खेळांचा समावेश आहे. याचा शुभारंभ आज क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक शरद नारकर, प्रशालेचे मुख्याध्यापक भास्कर नादकर, शिक्षक एस बी शिंदे, पी एम पाटील, नंदकिशोर प्रभू, व्ही एम मरळकर, संगीता पाटील, पी जे सावंत, संदेश तुळसकर, श्री.पवार यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.