
वैभववाडी : वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघामार्फत नाधवडे येथे शासकीय भात खरेदीचा शुभारंभ पार पडला.संघाने शेतकऱ्यांसाठी आणखी एक भात विक्री केंद्र सुरू केले.आतापर्यंत तालुक्यात पाच ठिकाणी भात विक्री केंद्र सुरू झाली आहेत.यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
तालुक्यात संघाकडून भात खरेदीला प्रारंभ झाला आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भात विक्री करताना होणारी वाहतूक अडचण लक्षात घेऊन तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने यावर्षी जादाच्या चार ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केली.यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च देखील वाचला आहे.आज नाधवडे येथे नव्याने भात खरेदी केंद्राचा शुभारंभ केला.
यावेळी वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद रावराणे, उपाध्यक्ष अंबाजी हुंबे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर नकाशे, नाधवडे उपसरपंच श्रीरंग पावसकर, नाधवडे सोसायटी चेअरमन अनिल नारकर, व्हा. चेअरमन संतोष पेडणेकर, माजी चेअरमन रविंद्र गुंडये, माजी उपसरपंच सुर्यकांत कांबळे, संचालक बाळा पावसकर, नंदकुमार सावंत, राजेश तावडे, दिगंबर सावंत, सचिव प्रदिप पार्टे, व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.