कणकवली खरेदी विक्री संघांत PM किसान समृद्धी सुविधा केंद्रांचा शुभारंभ

अधिवेशन सुरू असल्याने नितेश राणेंची ऑनलाईन उपस्थिती
Edited by: उमेश बुचडे
Published on: July 27, 2023 15:19 PM
views 250  views

कणकवली : देशभरात  सुरू करण्यात आलेल्या किसान समृद्धी सुवीधा केंद्राप्रमाणेच कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघांत सुविधा केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. देशभरात २ लाख ८ हजार इतकी केंद्रे सुरू करण्यात आली त्यात कणकवली केंद्राचा समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी राजस्थान मधुन  या पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्राचा  एकच वेळी शुभारंभ केला . हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तसेच आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात थेट प्रसारण  करून झाला.

 या केंद्रामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे , औषधे , खते , कीटकनाशके व अन्य अवजारे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत .

  कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघात  शेतकऱ्यांना एकत्रित करुन  पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे उद्घाटनपर भाषणाचे थेट प्रसारण करण्यात आले . या कार्यक्रमाला  शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला .

      कणकवली खरेदी विक्री संघांत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा सरचिटणीस मनोज रावराणे, सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास राव राणे भाजप अध्यक्ष संतोष कानडे मिलिंद मेस्त्री, शेतकरी संघाचे चेअरमन प्रकाश सावंत, व्हाईस चेअरमन सुरेश ढवळ, व्यवस्थापक गणेश तावडे, गणेश तांबे,संजय शिरसाट, तालुका कृषी अधिकारी श्रीमती मुळे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.