निलेश राणेंच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटावरील चित्र प्रदर्शनीचा शुभारंभ

Edited by:
Published on: September 17, 2023 13:56 PM
views 125  views

कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा पंधरवड्याचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने आज कुडाळ येथे भाजप कार्यालय समोर भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटावरील चित्र प्रदर्शनीचा शुभारंभ तसेच मेरी माटी मेरा देश या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, महिला मोर्चा प्रदेश सदस्या सौ.संध्या तेरसे, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, राजू राऊळ, बंड्या सावंत, विनायक राणे, विकास कुडाळकर, युवा मोर्चा कुडाळ मंडल अध्यक्ष रूपेश कानडे, ओरोस मंडल अध्यक्ष पप्या तवटे, न.पं.गटनेते विलास कुडाळकर, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दिपक नारकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ.आरती पाटील, सौ.प्रज्ञा राणे, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते