
सावंतवाडी : येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि माजगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने माजगाव येथे शनिवारी एनएसएस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन युवराज लखमराजे सावंत-भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते उपस्थित होते.
दरम्यान हे शिबीर माजगाव जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आले होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, सरपंच अर्चना सावंत, गीता कासार, माधवी भोगण, पूजा गावडे, मधु कुंभार, प्रज्ञा भोगण, रिचर्ड डिमेलो, संजय कानसे, ज्ञानेश्वर सावंत, माजी पं. स. सदस्य बाबू सावंत किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, आर. के. सावंत, चंद्रकांत सावंत, चंद्रकांत घाडी, शामराव सावंत आदी उपस्थित होते.