
देवगड : देवगड येथे आज प्रथमच जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या नव्या दालनाचा शुभारंभ सोहळा आज दिनांक १६ डिसेंबर दुपारी १२ वा. साई पार्क,देवगड निपाणी हाईवे,वदंबा,देवगड येथे करण्यात आला. देवगड जामसंडे फाटक क्लास नजीकच्या जागेत झालेल्या या सोहळ्याचा शुभारंभ आसावरी आनंद पेडणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या शुभारंभ प्रसंगी पेडणेकर ज्वेलर्स चे मालक आनंद जगन्नाथ पेडणेकर,आदित्य आनंद पेडणेकर,आसावरी आनंद पेडणेकर,रोमा आदित्य पेडणेकर,व कर्मचारी सिमरन कदम, कमलेश साळकर, व अन्य अनेक जण यावेळी उपस्थित होते.या सर्वांचे स्वागत या शोरूमचे मालक आनंद पेडणेकर यांनी केले. यावेळी माजी आमदार ऍड अजित गेगटे यांच्यासह अनेक नागरिकांनी भेटून आनंद पेडणेकर यांना शुभेच्छा दिल्या,