परब मराठा ज्ञाती बांधव मंडळांच्या ओरोसमधील नवीन कार्यालयाचे उद्घाटन !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 25, 2023 12:54 PM
views 369  views

सिंधुदुर्ग : मराठा समाजाच्या प्रत्येक तरुणाला व त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे आपण गावचे मानकरी असलो तरी विखुरलेले आहोत."आपले विचार बदला व सर्वांना सोबत घेऊन चला"तरच आपला समाज एकत्र येईल ही आपली भावना पाहिजे.एकत्र जमा समाज मोठा करूया. आपण संकल्पना करूया असे जी एस परब यांनी परब मराठा ज्ञाती बांधव मंडळांच्या ओरोस येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले. 

     परब मराठा समाज मुंबई- सिंधुदुर्ग जिल्हा संलग्न कार्यालयाचे विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर ओरोस रवळनाथ मंदिर समोरील पद्माकर परब यांच्या घरी  कार्यालयाचे फीत कापून मुंबईचे संस्था अध्यक्ष जी एस परब यांच्या हस्ते उद्घाटन झाले.कै.परब गुरुजी. यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करण्यात आले.

     यावेळी मुंबई संस्था अध्यक्ष जी एस परब, सिंधुदुर्ग संघटक अध्यक्ष विनायक परब, बाळकृष्ण परब, महादेव परब,परशुराम परब, राजन परब, सुहास परब, महादेव परब, शुभम परब ,सुशील परब, मारुती परब ,पद्माकर परब, विनोद परब, आदींसह सिंधुदुर्ग- मुंबई येथील परब बांधव,तसेच महिला भगिनीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

     यावेळी बोलताना जी एस परब म्हणाले गेल्या साठ वर्षांत परब समाजाने काय केले ते आता विसरून जायचं आहे आता आपण नवीन संकल्पना घेऊन पुढे चालायचे असून गेल्या साठ वर्षांपूर्वी कै. परब गुरुजींनी परब ज्ञाती बांधवांची मुंबई येथे संस्था स्थापन केले त्यांची संकल्पना,  व्हिजन,दूरदृष्टी,मोठी होती आता आम्ही ती चालू ठेवायला हवी. छोटेसे रोप लागले होते त्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. परब ज्ञाती बांधवांचा अनेक संस्था आहेत. १०० कोटींची मालमत्ता आहे. तुम्ही सभासद होणे गरजेचे आहे.तुम्ही एकत्र या शेअर्स होल्डर झालात तर त्याचे भागीदार होणार  तुम्हाला कोणतेही मदत मिळेल आपली पतसंस्था आहे. ती मोठी करुया व परब समाज मोठा करूया समाजाची कामे करा समाजाची ताकद दिसून येईल.नेतृत्व कोणाला म्हणायचे जो समाजा ला सोबत घेऊन जातो अशी आपण संकल्पना करूया असे परब म्हणाले.सुत्रसंचालन व आभार महादेव परब यांनी मानले.