
सावंतवाडी : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयामध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे सावंतवाडी शहर प्रमुख बाबू कुडतरकर माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर संजय गांधी निराधार योजनेचे पदाधिकारी गजानन नाटेकर शिल्पा मेस्त्री शिवानी पाटकर ज्योत्स्ना सुतार शिवानी तूयेकर दीपा सुकी लतिका सिंग संजना आंबेरकर तसेच सचिन इंगळे विनायक सावंत आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह लाभार्थी महिला उपस्थित होत्या.
यावेळी सर्व कागदपत्रांची जोडणी केल्यानंतर या सर्वांचे प्रस्ताव ऑनलाइन करण्यात येणार आहेत आजपासून फॉर्म भरून देण्याचे काम कार्यालयातून सुरू करण्यात आले याचा शुभारंभ करण्यात आला आहे. राज्यातील महायुती सरकारने शुक्रवारी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात नारीशक्तीवर सवलती आणि योजनांच्या वर्षाव केला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची तर मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारने केली आहे. राज्य सरकारने 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. ही योजना जुलैपासून सुरू झाली असून मागील वर्षापासून लेक लाडकी योजना सुरू आहे.
मुलींच्या जन्मापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात. आता यामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची भर पडली आहे. याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील 21 ते 60 वर्षाच्या महिलांनी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन भारती मोरे यांनी केले आहे.