निगुडेतील रस्त्यांच्या खडीकरण - डांबरीकरणाचा शुभारंभ

Edited by: विनायक गांवस
Published on: May 06, 2025 14:52 PM
views 218  views

सावंतवाडी : माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निगुडे गावातील गावठणवाडी व नवीन देऊळवाडी खडपकर पाटेकरवाडी या रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब तसेच तालुकाप्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. 

दरम्यान, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी श्री. परब यांचे आभार मानले. तसेच महिलांच्यावतीने श्री. परब यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य समिता नाईक, वर्षा नीगूडकर, सुप्रिया आश्वेकर, सिद्धेश गावडे, वसंत जाधव जयराम गवंडे, गुरुनाथ सावंत, विनोद सावंत, क्लेटस फर्नांडिस यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.