यशराज हॉस्पिटलमधील 'आई टेस्ट ट्युब बेबी' सेंटरचं दसऱ्याला उद्घाटन

Edited by: विनायक गांवस
Published on: October 10, 2024 07:41 AM
views 215  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज 'आई टेस्ट ट्युब बेबी' सेंटरचे उद्घाटन विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर होणार असून सौ.सुनिला सुधाकर नवांगुळ यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने याचा शुभारंभ होणार आहे. गोवा राज्यातील स्पेशालिस्ट डॉ. केदार पडते यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे अशी माहिती स्त्रीरोगतज्ञ डॉ. राजेश नवांगुळ यांनी दिली.

डॉ. नवांगुळ म्हणाले, मला आई व्हायचंय, ही महिलांची भावना असते‌. मात्र, काही अडचणी समोर असतात. महिलांच्या जीवनात मातृत्वासारखं दुसरं सुख नसत. परंतु, आजकाल विवाहीत जोडप्यांमध्ये वंध्यंत्वाची समस्या अधिक आढळून येते. यामागे विविध कारण असून मातृत्व प्राप्त न झाल्याने महिलांना समाजात हिणवलं जात. महिलांच आई होण्याचं स्वप्न अधूरं राहत. हे बघता 'आई टेस्ट ट्यूब बेबी'च्या माध्यमातून मातृत्वाच सुख जोडप्याच्या नशिबात देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी बाहेरील जिल्ह्यात, राज्यात होणारा मोठा खर्च देखील टाळता येणार आहे. वंध्यत्वावर मात करून संबंधितांच्या घरामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी सावंतवाडीत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आम्ही सुरू करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली. 

शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं. ४.०० ते ७.०० वा. या वेळेत यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जुना बांदा नाका, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी येथे आई टेस्ट ट्यूब बेबीचा शुभारंभ होणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. राजेश सुधाकर नवांगुळ, सौ. मनिषा राजेश नवांगुळ, डॉ. गायत्री शर्मा (पालयेकर), यश राजेश नवांगुळ अॅड. नकुल पार्सेकर यांनी केल आहे.