कर्ली खाडीवरील पुलाचे लोकार्पण

Edited by:
Published on: January 30, 2025 19:20 PM
views 243  views

सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सरंबळ टेंबवाडी सोनवडेपार वराड रस्त्यावरील कर्ली खाडीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे या कामाचा दि.  31 जानेवारी 2025 रोजी सायं. 5 वाजता सोनवडे गाव कर्ली नदीकाठी येथे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खासदार नारायण राणे, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य दीपक केसरकर, रविंद्र चव्हाण, निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सोनवडेचे सरपंच श्रीम. पूर्वीप्रमोद धुरी सावंत, वराडचे सरपंच श्रीम.शलाका समीर रावले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.