अणाव - भडगाव इथं आज पुलांच्या कामाचं लोकार्पण..!

Edited by: भरत केसरकर
Published on: September 04, 2023 10:26 AM
views 467  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील अणाव घाटचेपेड आणि भडगाव येथे जुन्या पुलाच्या ठिकाणी उंच पातळीचे पुल बांधणे या दोन्ही कामांचा लोकार्पण सोहळा आज सोमवार ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. अणाव घाटचेपेड पुलाचे दुपारी ३.३० वाजता तर  भडगाव पुलाचे दुपारी ४.३० लोकार्पण होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात येणार आहे.

तर यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, माजी खासदार निलेश राणे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य अभियंता शरद राजभोग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, छाया नाईक, विनायक जोशी हे उपस्थित राहणार आहेत.या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले आहे.