कणकवली रोटरीच्या नूतन कार्यकरिणीचा 15 जुलैला पदग्रहण सोहळा

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 14, 2023 13:36 PM
views 179  views

कणकवली : कणकवली रोटरी क्लब सेंट्रल च्या नूतन कार्यकरिणीचा 16 वा पदग्रहण सोहळा 15 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे संपन्न होणार आहे. कणकवली रोटरी क्लब सेंट्रलच्या प्रेसिडेंट पदी रवी परब, सचिवपदी प्रा जगदीश राणे, ट्रेझरपदी भेराराम राठोड तर व्हाईस प्रेसिडेंट पदी रमेश मालवीय यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती रोटरी क्लब कणकवली चे नूतन प्रेसिडेंट रवी परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.


यावेळी मावळत्या प्रेसिडेंट वर्षा बांदेकर, रोटरीयन मेघा गांगण, संतोष कांबळे, गुरू पावसकर, लवू पिळणकर, ऍड दीपक अंधारी, नितीन बांदेकर, दीपक बेलवकर, महेंद्र मुरकर, अनिल कर्पे, वीरेंद्र नाचणे, दादा कुडतरकर, राजेश कदम आदी उपस्थित होते. यावेळी नूतन प्रेसिडेंट रवी परब यांनी येत्या वर्षभरात रोटरी क्लब च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध 

सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कम्युनिटी डेव्हलपमेंट, बाल आरोग्य, महिला आरोग्य, जेष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, गुंतवणूक साक्षरता व जनजागृती अभियान, पांढरी काठी व जयपूर फूट, रक्तदान शिबिरे, टीबी मुक्त अभियान, जलव्यवस्थापन, यशस्वी जद्योजकांचा सत्कार, गरोदर माता व नवजात शिशु, शालेय मुले, शाळांना बेंच वितरण, सार्वजनिक स्वच्छता, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी पाककला स्पर्धा, गणेश चतुर्थी काळात बाजारात खरेदीला आल्यानंतर सुट्ट्या पैशांची उणीव जाणवत असते. यासाठी रोटरी क्लबकडून दीड लाख रुपयांचे सुट्टे पैसे वितरित करण्यात येणार आहेत. यासाठी रोटरी क्लबचा एक स्टॉल कणकवलीत बाजारात सोयीच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. यासह अन्य सामाजिक उपक्रम रोटरी क्लब कणकवलीच्या द्वारे घेण्यात येणार आहेत. डायलिसिस युनिट, आरसीसी विहीर बांधणी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले. कसवन तळवडे गावातील 50 घरांच्या वस्तीसाठी कणकवली रोटरी क्लब कडून आरसीसी विहीर मोफत बांधून देण्यात आली. यावर्षी च्या पाणीटंचाई काळात जवळपास सर्व गावाला या विहिरीचा पाणीपुरवठा करण्यात आला असे मावळत्या प्रेसिडेंट वर्षा बांदेकर यांनी सांगितले.