
सावंतवाडी : इनरव्हील क्लब ऑफ बांदाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बांदा विविध कार्यकारी सोसायटी कार्यक्रमात क्लबच्या अध्यक्षपदी अर्चना पांगम, उपाध्यक्षपदी रूपाली शिरसाट, सेक्रेटरीपदी प्रियांका हरमलकर, खजिनदारपदी श्वेता येडवे आय.एस.ओ.पदी निनता गोवेकर तर एडिटरपदी अक्षता साळगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली.
या सोहळ्याच्या विशेष अतिथी इनरव्हील क्लब सावंतवाडीच्या माजी अध्यक्ष रिया रेडिज आणि माजी सेक्रेटरी डॉ. मीना जोशी यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी तसेच नवीन सदस्य यांचे पदग्रहण झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून पतंजली योगचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी योग शिक्षक चंद्रशेखर बांदेकर उपस्थित होते. त्यांनी उत्तम आरोग्यासाठी महिलांनी नियमित योगासने व प्राणायाम करुन निरोगी राहण्याबाबत मार्गदर्शन केले. इनरव्हिल क्लबतर्फे त्यांचा योगशिक्षण प्रसारकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात इनरव्हील क्लब ऑफ बांदाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात तसेच गरजू विद्यार्थीनीला गणवेश तसेच गरजू महिलेला शिलाई मशिन प्रदान करण्यात आली.रिया रेडिज यांनी आपल्या मनोगतात बांदा क्लबने या वर्षभरात विविधी समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले. तसेच वाटचालीस शुभेच्छा सहकार्याचे आश्वासन दिले. सावंतवाडी इनरव्हील क्लब अध्यक्ष सुमेधा धुरी व सेक्रेटरी चित्रा देसाई यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. राखी कळंगुटकर, चित्रा भिसे श्रुती वळंजु, सोनाली राणे, अनुराधा धामापुरकर,माधवी गाड, मृणाल तोरसकर आदी या बांदा क्लबच्या सदस्य बनल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता साळगांवकर यांनी तर आभार प्रदर्शन माधवी गाड यांनी केले.