मातोंड, पेंडूर, वायंगणी ग्रामपंचायतवर भाजपचा तर खानोली ग्रामपंचायतवर शिवसेनेचा उपसरपंच

Edited by: दिपेश परब
Published on: November 24, 2023 16:05 PM
views 144  views

वेंगुर्ला : तालुक्यातील मातोंड, पेंडुर, खानोली, वायंगणी या चार ग्रामपंचायतमध्ये आज उपसरपंच निवड संपन्न झाली. यावेळी वायंगणी, मातोंड, पेंडुर या तिनही ग्रामपंचायतीवर भाजपच्या  उपसरपंकचांची तर खानोली ग्रामपंचायतवर शिवसेनेच्या (शिंदे गट) उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीत वायंगणी ग्रामपंचायतीत रविंद्र सहदेव धोंड  ( भाजपा ), पेंडुर ग्रामपंचायतीत महादेव विजय नाईक (भाजपा), मातोंड ग्रामपंचायतीत आनंद रामचंद्र परब (भाजपा ) तसेच खानोली ग्रामपंचायतीत सचिन आनंद परब (शिवसेना) हे उपसरपंचपदी विराजमान झाले.

वेंगुर्ले तालुक्यामध्ये झालेल्या निवडणुकीत मातोंड, पेंडूर व खानोली ग्रामपंचायतवर भाजपचे सरपंच तर वायंगणी ग्रामपंचायतवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सरपंच निवडून आले होते. तसेच उपसरपंच निवडीत ही चार पैकी तीन ठिकाणी भाजपाचे उपसरपंच बिनविरोध निवडून आल्यामुळे भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 

 वायंगणी ग्रामपंचायतवर भाजपचा उपसरपंच विराजमान झाल्यानंतर भाजपाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.  यावेळी जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , वायंगणी शक्तिकेंद्र प्रमुख व माजी सरपंच शामसुंदर मुननकर , माजी सरपंच तात्या केळजी , रविंद्र पंडीत , *ग्रामपंचायत सदस्य* - अनंत केळजी , महेश मुननकर , अनंत मठकर , राखी धोंड , विद्या गोवेकर , सविता परब , बुथप्रमुख आबा धोंड , संतोष साळगावकर , सुधर्मा कावले , दिगंबर धोंड , राकेश धोंड , विष्णु म्हारव , समिर धुरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .