कणकवलीत आठवडा बाजारात स्थानिक विरुद्ध बाहेरचे वाद पेटणार..?

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 28, 2023 13:21 PM
views 1036  views

कणकवली : शहरात मंगळवार आठवडा बाजाराच्या दिवशी कोल्हापूर व अन्न जिल्ह्यातून  येणाऱ्या किराणा माल दुकानदारांना कणकवली शहरातील स्थानिक किराणामाल दुकानदारांनी विरोध दर्शवला आहे. कणकवली तालुका व्यापारी संघाचे सदस्य हेमंत गोवेकर यांनी बोलताना सांगितले की आठवडा बाजार हा नाशवंत वस्तू किंवा फळे यांच्यासाठी असतो, पण आता सध्या सगळ्या वस्तू आठवड्या बाजारात मिळतात त्यामुळे स्थानिक किराणा माल व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना मोठा फटका बसत आहे.

येणाऱ्या व्यावसायिकांकडे फूड लायसन तसेच वजन काटा प्रमाणपत्र असते गरजेचे आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी देखील स्थानिक व्यापाऱ्यांनी या पर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यवसायिकांना विरोध असल्याचे सांगितले. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर सुलभा गावकर राजन पारकर अमोल कामत महेश देसाई प्रकाश काणेकर सचिन चव्हाण हर्षल अंधारे सुनील पारकर चेतन तामानेकर सुरज रणसूर सदानंद बाणे संदीप माणगावकर विनोद धोपकर रुपेश नार्वेकर प्रसाद डांबरे हे उपस्थित होते.

तसेच कोल्हापूर वरून किराणामाल विकणाऱ्या व्यवसायिकांनी बोलताना सांगितले की आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आठवडा बाजारामध्ये  गेली पंधरा ते वीस वर्षे येत आहोत तसेच नगरपंचायतीला रीतसर पावती देखील करतो त्यामुळे आम्हाला लेखी म्हणणे द्यावे त्यानंतर आम्ही याच्यावर विचार करू असे सांगितले.

त्यामुळे भविष्यात कणकवलीत स्थानिक किरणामाल व्यावसायिक आणि कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या किराणामाल व गरम सामान विकणारे व्यवसायिकांमध्ये वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे याच्यावर प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज  बोलले जात आहे.