नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवेमध्ये बाळगोपाळांनी फोडली हंडी

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 08, 2023 16:48 PM
views 81  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवे मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून नडगिवे येतील केजीच्या बाळगोपाळांनी गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

चिमुकले विद्यार्थी राधा व कृष्ण यांच्या वेशभूषेत शाळेत आले होते. त्यांनी श्रीकृष्णाच्या विविध गोष्टी ऐकल्या . विविध गाण्यांवर नृत्य सादर केले ,तसेच दहीहंडी फोडली. विद्यार्थ्यांचा हा उत्साह अवर्णनीय होता. विद्यार्थी जन्माष्टमी उत्सवात रंगून गेले होते. या कार्यक्रमाचे आयोजन केजी विभागच्या शिक्षिका चिन्मयी पराडकर, श्वेता आलते आणि भक्ती पाटील यांनी केले होते.