दोडामार्गात सकाळपासूनच जोर | 27 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क |

सरपंच पदाचे 69 उमेदवार व सदस्य पदाच्या 226 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद व्हायला सुरुवात
Edited by: संदीप देसाई
Published on: December 18, 2022 09:21 AM
views 156  views

दोडामार्ग : तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या निवडणूक जाहीर झाल्या होत्या. पैकी ३ ग्रामपंचायत पूर्णपणे बिनविरोध आणि मणेरीत सरपंच आणि घोडगेवाडी ग्रामपंचायतीत सर्व सदस्य पद बिनविरोध झाल्याने शिवाय फुकेरीत सरपंच पदासाठी कुणीच अर्ज दाखल केल्याने आज रविवारी दोडामार्ग तालुक्यात थेट 23 सरपंच पदासाठी रिंगणात असलेल्या 69 उमेदवार व 105 सदस्य पदसाठी निवडणूकित उभे राहिलेल्या 226 उमेदवार साठी प्रत्यक्ष मतदान प्रकिया सुरू झाली आहे. 

    तालुक्यात 74 मतदान केंद्रावर व मतदान प्रक्रिया सुरू असून 380 कर्मचारी अधिकारी त्यासाठी काम करत आहेत. ग्रामपंचायत आणि थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने प्रत्येक उमेदवार साठी एक एक मत अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रत्येक उमेदवार व त्यांचे हितचिंतक सकाळपासूनच मतदारांच्या घरासमोर मतदान करून घेण्यासाठी पोहचले आहेत. 

  दोडमार्गात एकूण 28 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम होत आहे.

 यात केर भेकुर्ली, मोर्ले व विर्डी या तीन ग्रामपंचायतच्या संपूर्ण सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत.

 फुकेरी गावचे सरपंच पद इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असून तिथं एकही अर्ज न आल्याने निवडणूक मतदान होणार नाही, तर मणेरी गावच्या सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून घोडगेवाडी गावात या उलट सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले असून फक्त सरपंच पदाची निवडणूक होत आहे. एकूणच रविवारी 28 पैकी 23 थेट सरपंच पदासाठी 69 उमेदवार करिता मतदान प्रक्रिया होत आहे.

  तर एकूण 28 ग्रामपंचायतीच्या 84 प्रभाग पैकी 28 प्रभाग बिनविरोध झाले असल्याने उर्वरित 56 प्रभागातील 105 जागांसाठी 226 उमेदवार करिता मतदार मतदान करणार आहेत. तालुक्यातील 28 ग्रामपंचायत साठी एकूण 29 हजार 85 मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते, पैकी 3 गावांच्या निवडणूक बिनविरोध झाल्या असल्याने या गावचे विर्डी 747, मोर्ले 456 व केर भेकुर्ली 729 असे 1932 मतदार वगळता उर्वरित सुमारे 27 हजार मतदार सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांसाठी मतदानाचा हक्क वाजवणार आहेत. यासाठी गावोगावी सकाळपासूनच उमेदवार व कार्यकर्ते मतदारांना मतदार केंद्रावर आणून मतदान करून घेण्याचा कामांत व्यस्त झाले आहेत.