उपसरपंच पदाच्या निवडीत लोकनियुक्त सरपंचांच्या निर्णायक मतानं रंगत !

28 पैकी 20 बिनविरोध तर 8 गावात झालं मतदान
Edited by: संदीप देसाई
Published on: December 30, 2022 21:21 PM
views 220  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात उपसरपंचपदाच्या निवडणुका अतिशय रंगतदार अशा झाल्या. सर्व सदस्यांबरोबर लोकनियुक्त थेट सरपंच यांना अतिरिक्त निर्णायक मताचा अधिकार प्राप्त झाल्याने उपसरपंच पदाच्या निवडणुकीत अनेकांचे मनसुबे धुळीस मिळाले. तालुक्यात शुक्रवारी पार पडलेल्या २८ पैकी २० ग्रामपंचायतीत उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. तर ८ ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदासाठी मतदान प्रशासनाला मतदान घ्यावे लागले. मात्र या आठही  ठिकाणी सरपंच यांचंच मत निर्णायक ठरलं. 


तालुक्यात  पिकुळे, परमे-पणतुर्ली, घोटगे व झरेबांबर-आंबेली या चार ग्रामपंचायतचे उपसरपंच लोकनियुक्त सरपंच यांनी आपले निर्णायक मध्ये निवडून आणले. त्यात तालुक्यातील ८ ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकित कुंब्रल उपसरपंच पदासाठी अमित दत्ताराम सावंत व करुणा मधुकर कदम यांच्यात लढत झाली. करुणा कदम यांना एक व अमित सावंत यांना पाच मते मिळाल्याने अमित सावंत उपसरपंच पदी निवडून आले. कळणे उपसरपंच पदासाठी भिकाजी आत्माराम देसाई, विठ्ठल वामन नाईक व प्रिया प्रेमानंद नाईक यांनी अर्ज भरले. प्रिया नाईक यांनी अर्ज मागे घेतल्याने भिकाजी देसाई व विठ्ठल नाईक यांच्या लढत झाली. दोघाही उमेदवारांना प्रत्येकी चार मते मिळाल्याने तेथे टाय झाली. अखेर सरपंचांच्या निर्णायक मताने भिकाजी देसाई विजयी झाले. कोनाळ उपसरपंच पदी रत्नकांत रामदास कर्पे व शुभ्रा शिवाजी लोंढे यांच्यात लढत झाली. रत्नकांत कर्पे यांना सहा तर शुभ्रा लोंढे यांना शून्य मते मिळाल्याने रत्नकांत कर्पे विजयी झाले. घोटगे उपसरपंच पदासाठी विजय प्रकाश दळवी व अजय वासुदेव दळवी यांच्यात लढत झाली. दोघांनाही प्रत्येकी चार मते मिळाल्याने तेथे टाय झाली. अखेर सरपंचांच्या निर्णायक मताने विजय दळवी विजयी झाले. झरेबांबर-आंबेली उपसरपंच पदासाठी शाम विठ्ठल नाईक व सर्वेश दिलीप माणगावकर यांच्यात लढत झाली. दोघांनाही प्रत्येकी पाच मते मिळाल्याने तेथे टाय झाली व अखेर सरपंचांच्या निर्णय मताने श्याम नाईक विजयी झाले. पिकुळे उपसरपंच पदासाठी निलेश गुरुदास गवस व गिरिजा गुरुदास गवस यांच्यात लढत झाली. दोघांनाही प्रत्येकी पाच मते मिळाल्याने तेथे टाय झाली व अखेर सरपंचाच्या निर्णायक मताने निलेश गवस विजयी झाले. तळेखोल येथे महादेव दशरथ नाईक व शाम शंकर गवत यांच्यात लढत झाली. महादेव नाईक यांना सहा व श्याम गवस यांना दोन मते मिळाली. त्यामुळे महादेव नाईक हे विजयी झाले. परमे-पणतुर्ली येथेही दिया गवस व सुनील गवस  या दोन उमेदवारांत टाय झाली तेथे सरपंच प्रथमेश मणेरिकर यांच्या निर्णय मताने दिया दीपक गवस विजयी झाल्या. 


या २० गावांचे उपसरपंच झाले बिनविरोध


फुकेरी- निलेश आनंद आईर, झोळंबे -विनायक सदाशिव गाडगीळ, तळकट- रमाकांत शंकर गवस, कोलझर -पांडुरंग परशुराम राणे, मोरगाव- देविदास महादेव पिरणकर, आडाळी- परेश प्रकाश सावंत, सासोली -अनिरुद्ध अविनाश फाटक, मणेरी -राया बिरू काळे, केर-भेकुर्ली- तेजस तुकाराम देसाई, मोर्ले -संतोष जोमा मोर्ये, घोटगेवाडी- सागर विश्वनाथ कर्पे, बोडदे -लीना एडविन फर्नांडिस, मांगेली- कृष्णा सातू गवस, उसप- बळीराम विश्वनाथ नाईक, खोक्रल -अंजू महादेव गवस, वझरे-गिरोडे- चंद्रकांत विष्णू नाईक, विर्डी -एकनाथ विष्णू गवस, आयी- भदी वासुदेव गवस, माटणे- चांदणी चंदन शिरोडकर, आंबडगाव -मोहन विष्णू गवस.


बाळासाहेबांच्या शिवसेनेने १३ ग्रामपंचायतवर केला दावा 


दोडामार्ग तालुक्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेने तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपसरपंच बसल्याचा दावा केला आहे. तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी ही माहिती दिली आहे. दावा केलेल्या ग्रामपंचायत मध्ये विनायक गाडगीळ झोळंबे, रोहन देसाई -कोलझर, वैभव फाटक सासोली, किरण काळे मणेरी, मोहन गवस आंबडगाव, रत्नकांत कर्पे, को कोनाळकट्टा, विजय दळवी घोटगे, निलेश गवस- पिकुळे, श्याम नाईक झरेबांबर - आंबेली, लीना फर्नांडिस खानयाळे-बोडदे, सागर कर्पे घोटगेवाडी, तेजस देसाई-केर, कृष्णा गवस मांगेली या उपसरपंचावर गणेश प्रसाद गवस यांनी दावा केला आहे.


उद्धव ठाकरे शिवसेनेकडून ९ ग्रामपंचायतवर दावा


दोडामार्गात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे  उपसरपंच बसले असल्याची दावा तालुकाप्रमुख संजय गवस यांनी केला आहे. त्यात संतोष मोर्ये - मोर्ले, विजय दळवी - घोटगे, श्याम नाईक-झरेबांबर, सागर कर्पे - घोडगेवाडी, कृष्णा गवस - मांगेली, पांडुरंग राणे- कोलझर, बळीराम नाईक- उसप, नमित नाईक - तळेखोल, मोहन गवस- आंबडगाव या ९ ग्रामपंचायतवर दावा केला आहे. तर आयी, मणेरी, सासोली, कोनाळ ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या उमेदवारांना शिवसेना ग्रामपंचायत सदस्यांनी मदत केली असून, विजयी झालेले उपसरपंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे असल्याचे मत शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस व्यक्त केला आहे.


भाजप १६ ग्रामपंचायत वर दावा


दरम्यान भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी तालुक्यातभाजप पुरस्कृत १६ उपसरपंच निवडून आल्याचा दावा केलाय. त्यात विनय गाडगीळ - झोळंबे, रमाकांत सावंत- तळकट, देऊ पिरणकर-मोरगाव, परेश सावंत- आडाळी, चांदणी शिरोडकर - माटणे, राया काळे मनेरी, चंद्रकांत नाईक- वझरे, अनिरुद्ध फाटक - सासोली, भिकाजी देसाई -कळणे, नमित नाईक - तळेखोल, खोक्रल, बोडदे या गावचे उपसरपंच भाजप पुरस्कृत असल्याचे म्हटले आहे.