उसपच्या उपसरपंच निवडणूकीतही प्रकाशनेच मारली बाजी | उपसरपंचपदी ऍड. दाजी नाईक

जनतेने दाखवलेला विश्वास सार्थकी लावणार : प्रकाश गवस
Edited by: संदीप देसाई
Published on: December 30, 2022 16:33 PM
views 225  views

दोडामार्ग : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पुसद ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रुचिता गवस यांची वर्णी लागल्यानंतर शुक्रवारी झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीतही यांच्याच पॅनलने बाजी मारली असून उसप गावच्या उपसरपंच पदी उच्चशिक्षित एडवोकेट दाजी नाईक यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. जनतेने दाखवलेला विश्वास सार्थकी लावणार असून उसप गावचा सर्वांगीण विकास हाच आपला अजेंडा राहणार असल्याची माहिती ग्राम विकास संघाचे प्रकाश गवस यांनी दिली आहे.

शुक्रवारी उसप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. यात ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आलेल्या या उच्चशिक्षित उच्चशिक्षित सदस्यांना गावच्या उपसरपंच पदी निवड करण्यात आली. उसप ग्रामसेवा संघाचे प्रकाश गवस, माजी जि प सदस्य चंद्रकांत मळीक, दशरथ मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य  विनिता मोरजकर, करुणा गवस यांसह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांनी स्वतः उपस्थित राहून व  व उपसरपंच पदी दाजी नाईक यांचं अभिनंदन केल आहे यावेळी शंकर देसाई, विठ्ठल नाना गवस, नारायण सखाराम गवस, अभिषेक गवस, निलेश गवस,  गोपाळ नाईक, मोहन गवस, संजय मलिक, महेंद्र मोरजकर, विलास मोरजकर, गंगाराम गवस, शिवा गवस, पांडुरंग गवस, नितीन रेडकर उपस्थित होते.