देशात इंडिया आघाडीची सत्ता आणि पंतप्रधान काँग्रेसचा असणार : भाई जगताप

Edited by: देवयानी वरसकर
Published on: February 06, 2024 09:25 AM
views 195  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे समन्वयक आमदार भाई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक पतसंस्था हाॅल ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे पार पडली. यावेळी बोलताना भाई जगताप यांनी देशात इंडिया आघाडीचीच सत्ता येईल असे सांगून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार गेली दहा वर्षे पूर्ण बहुमतात असून सपशेल अपयशी ठरले आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे, आपले अपयश झाकण्यासाठी धर्मा-धर्मात जाती-जातीत भांडणे लावण्याचे पाप भाजप करत आहे.

2014 मध्ये मोदी सत्तेवर येण्यासाठी मला फक्त साठ महिने द्या म्हणारे आता 2047 पर्यंतची स्वप्ने दाखवत आहेत. न खाऊंगा ना खाने दुंगा म्हणारे ज्यांच्यावर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना आपल्या पक्षात घेऊन मंत्रिपदे देत आहेत आणि भाजपच्या वाॅशींग मशीनमध्ये घालून क्लिनचीट देत आहेत. भाजपने भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठला आहे.म्हणून या भ्रष्ट भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी देशातील जनता लोकसभा निवडणुकांची वाट पाहत आहे आपण ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचंड विजयासाठी प्रयत्न करावेत. इंडीया आघाडीत जागा वाटपाची चर्चा चालू असून लवकर जागा वाटप होईल असे आमदार भाई जगताप यांनी बोलताना सांगीतले. या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष व प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, सुगंधा साटम, उपाध्यक्ष नागेश मोर्ये,विजय प्रभू,सरचिटणीस चंद्रशेखर जोशी,अरविंद मोंडकर, प्रवीण वरुणकर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश अंधारी, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नंद्दीहळ्ळी,नगराध्यक्षा अक्षता खटावकर, माजी नगराध्यक्षा आफ्रिन करोल, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, देवगड तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी,वैभववाडी तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, सचिव रविंद्र म्हापसेकर, आनंद परूळेकर, स्मीता वागळे,अमोल सावंत, केतनकुमार गावडे, उल्हास मणचेकर, बाळा धाऊसकर,संजय लाड, सुंदरवल्ली पडियाची,गणेश पाडगांवकर, जस्मीन लक्शमेश्वर, श्रेया मुद्रस, भारती कुडतरकर, सत्यवान तेंडोलकर,तबरेज शेख,शिवदास मणेरीकर, काशीम चोचे,तुषार भाबल, प्रदीपकुमार जाधव, सुरज घाडी, सरदार ताजर, अजय मोर्ये,अनिकेत दहिबावकर,निलेश मालंडकर,अमित नाटेकर,एकनाथ नाईक,दस्तगीर नाचरे इत्यादी उपस्थित होते.