
सावंतवाडी : सावंतवाडी येथील भोसले उद्यानात काम करत असताना झाडावरून पडून कर्नाटक धारवाड येथील कामगाराचा गोवा बांबुळी येथे अधिक उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. कुटुंब चालक म्हणून जी व्यक्ती होती तीलाच आज ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला. मूळ कर्नाटक धारवाड येथील कांमधंद्यासाठी सावंतवाडीत वास्तव्यास असलेले हे कुटुंब बापाविना पोरक झालं आहे, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची असल्याने अपघातात जबाबदारी ठेकेदाराने मात्र नाकारली आहे. तो मी नव्हेच अशी भूमिका घेत पीडित कुटुंबीयांना दमदाटी करत कोणतीही भरपाई देणार नसल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन कार्यकारणी योग्य त्या शासकीय कार्यालयात अर्ज दाखल करून दोषी ठेकेदारावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करून पीडित व्यक्तीला सक्षम न्याय सुरक्षा मिळवून देणार आहे, असे आश्वासन अमित वेंगुर्लेकर यांनी दिले आहे. या वेळी जिल्हा अध्यक्ष रिजवान बाडीवाले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य परवेज बेग, संजय गावडे, रामिझ मुल्ला, संतोष तलवणेकर,अबिद कित्तुर्, शेहेबाज शेख आदी उपस्थित होते.