
सावंतवाडी : १२ नोव्हेंबरला खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप व शिंदे गट युतीचे १२ वाजणार, महाविकास आघाडीच्या 'महाविकास वैभव पॅनल'च विमान 'टेकऑफ' घेणार, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये सर्व उमेदवार हे अनुभवी आहेत. गेल्या पाच वर्षांत चांगल काम आमच्या पॅंनलने केले आहे. त्यामुळे विरोधांकानी कितीही बोंब मारली तरी विजय हा आमचा होणार, १२ तारीखला युतीचे १२ वाजणार असल्याचा दावा राऊळ यांनी केला. तर मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत असलेले विद्याधर परब हे शरीराने त्यांच्यासोबत असले तरी मनानं आमच्या सोबत आहेत, असं मत व्यक्त केले. यावेळी रमेश गावकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, कॉग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, राजेंद्र म्हापसेकर, आबा सावंत आदी उपस्थित होते.