सावंतवाडीत शिंदे-ठाकरे शिवसेना साथ-साथ !

Edited by: विनायक गावस
Published on: June 14, 2023 19:32 PM
views 338  views

सावंतवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिंदे गटाकडुन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांचे स्वागत करण्यात आले.तहसीलदार म्हणून श्रीधर पाटील यांनी आज आपला पदभार स्वीकारला. यावेळी ठाकरे आणि शिंदे सेनेचे शिलेदार एकाच ठिकाणी 'साथ-साथ' दिसले. एकेकाळी एकत्र असणारी तालुकाप्रमुख व शहरप्रमुखाची ही जोडी सेनेतील बंडानंतर विभक्त झाली. परंतु, आज तहसीलदारांच्या स्वागता दरम्यान ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ व शिंदे गटाचे शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर हे दोन मित्र एकत्र आले. या दोघांनी तहसीलदारांना शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आदी उपस्थित होते. या निमित्ताने शिवसेनेतील दोन गटात विभक्त झालेले सैनिक एकत्र येताना पहायला मिळाले.