करुळ घाटात पुन्हा ट्रक कोसळला दरीत | चालक सुदैवाने बचावला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 20, 2023 11:23 AM
views 322  views

वैभववाडी : करूळ घाटात चालकाचा गाडीवरील ताबा सुटून  खोल दरीत ट्रक कोसळला.आज रविवारी पहाटे हा अपघात झाला.चालकाने उडी मारल्याने तो बचावला. कोल्हापुरहून ट्रक सावंतवाडीला निघाला होता.

करुळ घाटात सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला.शनिवारी वाळूने भरलेल्या डंपर दरीत कोसळला होता.या अपघातात चालक ठार झाला होता. पुन्हा आज करूळ घाटात दुसरा अपघात झाला. कोल्हापूरहून सावंतवाडीकडे जाणारा लोखंडी शिगा भरलेला ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दरीत कोसळला. चालकाने प्रसंगावधान राखत  उडी मारल्याने तो  बचावला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.