कणकवलीत महिला,युवा व बाल वर्गाला गुरुपुत्र नितीन भाऊ मोरे यांचे लाभले मार्गदर्शन

सेवेकऱ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून घेतला मार्गदर्शनाचा लाभ
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 10, 2023 21:26 PM
views 140  views

कणकवली : 20 टक्के अध्यात्म व 80 टक्के समाजकार्य" या संकल्पनेतून एकूण 18 विभाग अंतर्गत केंद्र स्तरावर ज्ञानदानाचे कार्य विनामूल्य स्वरूपात सुरू आहे. या उदात्त हेतूने परमपूज्य गुरुमाऊलींना अपेक्षित असे ग्राम व नागरी विकास अभियान अंतर्गत सर्वसामान्य सेवेकरी व भाविकांना काळाची गरज असलेल्या या सेवांचा याचा लाभ घेता यावा यासाठी कणकवली चौंडेश्वरी मंदिर येथे  रविवार दिनांक 9 एप्रिल सकाळी 10 मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियान ,अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ ,श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाचा सेविकारांनी घेतला लाभ या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ मोरे यांचे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी गुरुपुत्र नितीन भाऊ मोरे यांनी 

स्वतःसह  इतरांना प्रवाहामध्ये आणून राष्ट्रनिर्मितील मूलभूत समजले जाणारे विभाग, गर्भसंस्कार, शिशु संस्कार, बालसंस्कार व युवाप़बोधन विभागांचे  मार्गदर्शन केले भविष्य घडविण्यासाठी युवा युवती तसेच महिला आणि बाल वर्गाला प्रबोधन केले आपल्या आजूबाजूच्या घडामोडीतून आपण मुलांना चांगले कसे शिक्षण देऊ शकतो आणि आपले भविष्य आपली मुलं आहेत हे सांगत चांगले मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने संख्येने सेवेकरी  उपस्थित होते. 

यावेळी कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व्यापारी अध्यक्ष दीपक बेलवलकर, किशोर राणे- नगरसेवक, नगरसेविका कविता राणे, श्री स्वामी समर्थ मठ कळमट यांचे मठाधिपती श्री मठकर, राजश्री धुमाळे डॉक्टर नितीन तायशेटेये, यांनी देखील भेट दिली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकुमार आरोलकर रमेश जगदाळे सुधीर धुमाळे, अविनाश साळगावकर मिलिंद कोदे अभिजीत हुन्नरे रंजन पोहेकर रूपा पोहेकर विजय तावडे आशा धुमाळे वैष्णवी लिंग्रज नीलम हर्णे व नीलम वरणे सावंतवाडी केंद्राचे श्री  विचारेभाऊ व सेवेकरी, वैभववाडी केंद्राचे श्री कडूभाऊ व सेवेकरी, वराड केंद्राचे प्रतिनिधी व सेवेकरी, आचरा केंद्राचे सौ दूखंडे व कविता नार्वेकरविद्या म्हापसेकर यांच्यासह बहुसंख्य सेवेकरी खूप मेहनत घेतली