
कणकवली : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यात सोमवारी छाननी प्रक्रिया पार पडली.सरपंच पदासाठीचे २२० तर सदस्य पदासाठीचे १०८३ अर्ज वैध ठरले.तर कणकवली तालुक्यात सरपंच पदाचे ४, ग्रामपंचायत सदस्य पदाचे १८ अवैध ठरले आहे.सरपंच पदाचे वांयगणी, शिडवणे, करुळ एकमेव सरपंच पदाचा अर्ज राहिल्याने ते उमेदवार बिनविरोध होणार आहेत,अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांनी दिली. कणकवली तहसीलदार कार्यालयात ग्रामपंचयत निवडणूकीसाठी दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया होती.त्यासाठी सकाळपासूनच तहसिलदार कार्यालयाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.निवडणूक विभागात छाननी साठी ३८ टेबल वर विविध ग्रामपंचायत अर्जांची छाननी करण्यात आली.साकेडी ग्रामपंचायत मधील दाखल अर्जावर हरकती अनेक आल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत छाननी प्रक्रिया सुरु होती.त्यानंतर हुंबरट ग्रामपंचायत अर्जावर छाननी करण्यात आली. या छाटणीमध्ये १८ सदस्यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.त्यामध्ये असलदे, बिडवाडी, फोंडाघाट, घोणसरी,करंजे, कुंभवडे,माईन, नांदगाव, वाघेरी, वारगाव, तळेरे या गावातील प्रत्येकी १ अर्ज अवैध ठरला आहे.तर साकेडी येथील ५ सदस्य,ओसरगाव २ सदस्याचा समावेश आहे. तर हळवल, करुळ येथील प्रत्येकी १ व साकेडी २ सरपंच पदाचे अर्ज अवैध ठरले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल अर्जांवर सोमवारी छाननी असल्याने कणकवली तहसील कार्यालयात परिसरात भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री,महेश गुरव,प्रकाश पारकर,संदीप सावंत,पंढरी वायगणकर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख तालुकाप्रमुख शैलेश भोगले, रामू विखाळे,सचिन सावंत,सुशांत नाईक,राजू शेट्ये,कन्हैया पारकर, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे तालुकाध्यक्ष भूषण परुळेकर,शरद वायंगणकर आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने संध्याकाळपर्यंत गर्दी करून उपस्थित होते.तसेच आज छाननीवेळी तहसील कार्यालय परिसरात कणकवली पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला होता. ७ डिसेंबरला माघारीचा दिवस.. कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज माघारी साठी ७ डिसेंबरला सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत कालावधी असणार आहे. माघार घेणाऱ्या उमेदवारांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे रीतसर अर्ज सादर करावा लागणार आहे.आता कोण कोण निवडणुकीतून माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.