
कणकवली : कणकवली शिवाजीनगर येथे दुपारी 3 वाजता मंदिरातील पूजेचे सामान मिळाल्याने खळबळ उडाली आहे. त्या पिशवी शेजारी एक अनोळखी व्यक्ती देखील आढळून आला असल्याने शिवाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते.
या मंदिरातील सामानामध्ये मोठी घंटा याबरोबर अन्य सामान लामनदिवे, समई, पंचारत, फुलपत्र, तामण, पळी आढळून आल्याने ताबडतोब एलसीबी शाखेचे पीएसआय शेळके, राजू जामसांडेकर, पोलीस हवालदार खंडे, गुरुनाथ कोयंडे, कणकवली पोलीस हवालदार घाडीगावकर, महिला पोलीस प्रणाली जाधव यांनी धाव घेत सामान ताब्यात घेतले.