कणकवली शहरात एक किलो गांजासह दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 27, 2023 13:14 PM
views 796  views

कणकवली  :  कणकवली शहरात गांजा विक्री प्रकरणी 38 हजार 800 रुपये किंमती चा 1 किलो 110 ग्रॅम गांजा सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने काल 26 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी पकडला. हॉटेल अप्पर डेक समोर सर्व्हिस रोडवर एलसीबी ने ही मोहीम फत्ते केली.

या गुन्ह्यात निलेश ज्ञानदेव साटम (वय 44, रा. जानवली गावठणवाडी), आणि चेतन रामू जाधव (वय 20 वर्षे, रा. कलमठ कुंभारवाडी) या दोघांना अटक करण्यात आली. आहे. 50 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल रोख, 180 रुपये आणि 5 हजार रुपयांचा मोबाईल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला आहे. कणकवली मधील ही दुसरी  झालेली कारवाई असून या गांजा व्यवसाय मागचा खरा सूत्रधार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत असून पोलिसांनी या अवैध्य व्यवसायांच्या  मुळाशी जाऊन कारवाई करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.


सध्या अंमली पदार्थ विक्री विरोधात एसपी अग्रवाल यांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून यांच्या आदेशानुसार एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मिलिंद घाग, पीएसआय आर बी शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, प्रमोद काळसेकर, अनुप खंडे, बसत्याव डिसोझा, आशिष जामदार, प्रकाश कदम, 1 किरण देसाई, पोलीस नाईक अमित तेली, पालकर, जयेश सरमळकर यांच्या पथकाने केली. फिर्याद हवालदार प्रमोद काळसेकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पीएसआय शरद देठे करत आहेत.