
कणकवली : ग्रामपंचायत घोणसरी तालुका कणकवली येथे राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रम अंतर्गत बायोगॅस वापर प्रशिक्षण कार्यक्रम आणि कृषी मेळाव्याचे आयोजन कणकवली पंचायत समिती आणि ग्रामपंचायत घोणसरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी विरेश अंधारी यांनी बायोगॅस वापराबाबत लोकांना मार्गदर्शन केले. भगीरथ प्रतिष्ठान चे डॉ. प्रसाद देवधर यांनी बायोगॅस बांधणी आणि बायोगॅस व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले.
कणकवली तालुक्याच्या एकूण उद्दिष्टा पैकी 40 टक्के उद्दिष्ट एकट्या ग्रामपंचायत घोणसरी ने साध्य केले. त्या निमित्त जिल्हा कृषी अधिकारी जि. प.सिंधुदुर्ग यांच्या हस्ते सरपंच मॅक्सी पिंटो आणि ग्रामसेवक सिद्धेश गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तालुक्याचे सहा गटविकास अधिकारी सूर्यकांत वारंग, कृषी अधिकारी पवार ,कृषी विस्तार अधिकारी सुनिल पांगम, रवी मेस्त्री, सरपंच मॅक्सी पिंटो, भगीरथ प्रतिष्ठान चे प्रसाद देवधर, तालुका कृषी कार्यालयाकडून डॉ.आनंद तेंडुलकर, मंडळ अधिकारी पवार,कृषी पर्यवेक्षक वरलेकर, कृषी सहा्यक कानडे, उपसरपंच कारेकर ,दूध डेअरी चेअरमन गणपत परब आणि ग्रा.प. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश गोसावी यांनी केले.