व्याज माफी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग

Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2023 18:23 PM
views 211  views

सावंतवाडी : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाचे पैसे परत केले जातात. कोलगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी व्याज सवलत योजनेतील व्याज माफी रक्कम ४ लाख ७ हजार ५८६ रूपये कोलगाव संस्थेच्या १०५ सभासदांच्या बचत खात्यात वर्ग करण्यात आली. जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते हा धनादेश सभासदांच्या खात्यात वर्ग केला गेला. याबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थेचे चेअरमन विरेंद्र धुरी, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.