दोडामार्गमध्ये ठाकरे सेनेने शून्य शिक्षकी शाळांबाबत सरकाराचा नोंदवला निषेध...!

Edited by: संदीप देसाई
Published on: June 15, 2023 19:21 PM
views 106  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात १३ शाळां शून्य शिक्षकी झाल्या असून राज्य सरकारचा कारभार दळभद्री असल्याचा संनसनाटी आरोप करत आपल्याला जमत नसेल तर या सर्व शाळांत आम्ही शिवसेनेच्या वतीनं शिक्षक पाठवतो. आपण फक्त त्यासाठी सहकार्य करा त्यांचं मानधन ही शिवसेनाच देईल असं ठणकावल. दोडामार्ग तालुका गटशिक्षण अधिकारी आर. जी. नदाफ यांना सहकार्य करण्याचे आवाहन करत या आंदोलन कर्त्यानी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सरकारचा निषेध केला. 

गुरवारी सकाळीच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी तालुका प्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेना येथील पंचायत समितीवर धडक दिली पंचायत समितीच्या दरवाजावरच ठिय्या मांडत सरकारचा निषेध नोंदवला. शिक्षण आपल्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा दे घोषणा देत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या राज्य सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली. दोडामार्ग तालुक्यात 13 शाळा शून्य शिक्षकी झाले असताना शिक्षण विभाग व येथील राज्यकर्ते गप्प कसे?  जिल्ह्यातील शिक्षण मंत्री असूनही त्यांच्याच मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळांमध्ये शिक्षक नसतील तर यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही, अशा शब्दात बाबुराव धुरी यांनी शिक्षण मंत्री केसरकर यांच्यावर तोफ डागली. इतकचं नव्हे तर सरकार जरी आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत गंभीर नसेल तरी शिवसेना याप्रश्नी गप्प बसणार नाही, आजपासून एक महिना आपल्याला देत आहोत, महिना भरात सर्व शाळांत शासन नियमानुसार शिक्षक हजर झाले पाहिजेत, अन्यथा पुन्हा याठिकाणी गटशिक्षाधिकारी या सोबत घेऊन आंदोलन छेडू असा आक्रमक इशारा धुरी यांनी दिला. इतकंच नव्हे तर तालुक्यांतील डीएड  बेरोजगार यांचेशी संपर्क साधून या एक महिन्यासाठी शिवसेना शिक्षक नियुक्त करत असल्याचे सांगत, शिक्षण विभागाने यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन धुरी यांनी केलं. केंद्रप्रमुख यानांही शून्य शिक्षकी शाळांवर शिक्षक मिळेपर्यंत पाठविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी त्यांचे समवेत विनिता घाडी, उप तालुका प्रमुख मिलिंद नाईक,  विजय जाधव, मणेरी उपविभाग प्रमुख शिवराम मोरलेकर, सोनू खरवत, लक्ष्मण आयनोडकर, संजय नाईक, दशरथ मोरजकर, बबलू पांगम, उप तालुका संघटक संदेश वरक, यावेळी तालुका संघटक संदेश राणे, उपतालुकाप्रमुख संदेश गवस, युवा सेना विभाग प्रमुख मणेरी शुभम देसाई, युवा सेना शहर प्रमुख ओंकार कुलकर्णी, युवा सेना माटणे उपविभाग प्रमुख समीर मावसकर,   प्रदीप सावंत, अश्विन जाधव, श्याम खडपकर उपस्थित होते.

दरम्यान ज्या शाळांत शिक्षक नाही तेथे शिवसेना मानधन देऊन डीएड बेरोजगार शिक्षक म्हणून पाठविणार यांबाबत दोडामार्ग चे गटशिक्षणाधिकारी आरती नदाफ यांना विचारले असता त्यांनी शिवसेना ठेवलेल्या या प्रस्तावाचा स्वागत असल्यास सांगितलं शैक्षणिक चळवळी लोकसहभागातून पुढे न्यायची आहे आणि गाव स्तरावर स्वयं सहाय्यक म्हणून डीएड पदवी घेतलेले युवक जर शिक्षक म्हणून काम करत असतील तर त्याचे निश्चित स्वागत केले जाईल अशी बाजू मांडली. तर त्यांना या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विचारले असता तालुक्यातील सर्व शाळांमध्ये तात्पुरते ऍडजेस्टमेंट करून एक- एक शिक्षक नियुक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तालुक्यात २५७ शिक्षकांची पदे मंजूर  असून आज रोजी १०० शिक्षक पदे रिक्त असल्याची माहिती ही यावेळी त्यांनी दिली.