
सावंतवाडी : कोकण प्रांतातील मराठा बांधवांना आर्थीक दृष्टया मागासप्रवर्गाचे आरक्षण, कोकणाकरीता स्वत्रंत्र वैधानीक विकास मंडळ, सिंधुदुर्ग कृषी बाजार उत्पन समीतीचे सक्षमी करण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नेमणूकांमध्ये 90 टक्के स्थानिक उमेदवरांची भरती, कंत्राटी नोकर भरतीमध्ये 100 टक्के स्थानिक उमेदवारास प्राधान्य द्यावे अशा विविध मागण्या मराठा महासंघाकडून करण्यात आल्यात. मराठा महासंघाच्या मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या उमेदवारासह मराठा महासंघ राहील. सावंतवाडी मतदारसंघातील उमेदवारांकडून याला अपेक्षित प्रतिसाद न दिल्यास नोटा बटण दाबून निषेध व्यक्त करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष अँड. सुहास सावंत यांनी केले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, निवडून आल्यानंतर विधान सभेत जरांगे पाटील यांच्या हैदराबाद गॅझीटीअर व सगे सोयरे अध्यादेश विदर्भ मराठवाडा पुरता लागू करण्या करीता पाठपुरावा तसेच फेब्रुवारी 2024 मध्ये देण्यात आलेले फसवे आरक्षण रद्द करून त्याऐवजी कोकण प्रांतातील मराठा बांधवांना " आर्थीक दृष्टया मागासप्रवर्गाचे आरक्षण लागू करावे. कोकणाकरीता स्वत्रंत्र वैधानीक विकास मंडळ, सिंधुदुर्ग कृषी बाजार उत्पन समीतीचे सक्षमी करण, जिल्हयातील शेतमाल हा स्थानीक कृषी उत्पन्न समीती मार्फत विक्री व्यवस्था व सिंधुदुर्ग जिल्हयातील स्थानीक स्वराज्य संस्था मधील नेमणूकांमध्ये 90 टक्के स्थानीक उमेदवरांची भरती साठी शासन निर्णय करण्यासाठी प्रयत्न व कंत्राटी नोकर भरती मध्ये 100 टक्के स्थानीक उमेदवार आदी मागण्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सावंतवाडी मतदारसंघातील उमेदवारांकडे करण्यात आल्यात आहेत. मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या उमेदवारासह मराठा महासंघ राहणार असून अपेक्षित प्रतिसाद न दिल्यास नोटा बटण दाबून निषेध व्यक्त करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष अँड. सुहास सावंत यांनी केले आहे. यावेळी मनोहर येरम, अँड. सोनू गवस, अभिषेक सावंत, संजय लाड, वैभव जाधव, विनय गायकवाड, विशाल राऊळ, विनायक गावडे, गणेश ठाकूर आदी मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.