
सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून गावातील सहा अंगणवाडीतील मुलांना दररोज दूध वाटप योजना सुरू करण्यात आली असून याचा शुभारंभ सरपंच सौ मिलन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
गावातील लहान मुलांचे आरोग्य चांगले रहावे,कुपोषण मुक्त व्हावे आणि मुलांना सकस पौष्टिक आहार मिळावा हा हेतू मनात ठेवून हे दूध वाटप करण्यात येत असल्याचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी स्पष्ट केले. हे दूध वाटप करताना या दुधाबरोबर बदाम व पौष्टिक पदार्थ मुलांना दिला जातो. या दूध वाटप उपक्रमाचा निश्चितपणे अंगणवाडीतील मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी होईल असेही श्री. मराठे यांनी सांगितले.या वाटप शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य स्नेहल मुळीक,अंगणवाडी सेविका प्रियांका पार्सेकर, मदतनीस भारती मसुरकर उपस्थित होते.










