वाहनधारकांसाठी महत्वाचं

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 02, 2025 18:33 PM
views 1673  views

सिंधुदुर्गनगरी : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार शासनाने सर्व वाहनांना HSRP बसविण्याची तरतुद करण्यात आली आहे. वाहनांना नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना HSRP बसविणे आवश्यक आहे. असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  विजय काळे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व वाहनाधारकांनी त्यांच्या वाहनांना HSRP बसविण्याकरीता पुढीलप्रमाणे सूचना जारी  करण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी M/s FTA HSRP SOLUTION PVT LTD  ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली आहे. http://maharashtrahsrp.com या पोर्टल वाहनधारकांनी बुकींग करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेवून  HSRP नंबर प्लेट आपल्या वाहनास बसवून घ्यावी.

वाहनधारक सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानितिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास HSRP नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी काही तक्रार असल्यास संबंधित सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच सिंधुदूर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार दाखल करु शकतात.

नंबर प्लेट बसविण्यासाठी पुढीलप्रमाणे शुल्क हे GST वगळून आकारण्यात येणार आहे. वाहनाचा प्रकार व कंसात शुल्क, दुचाकी/ ट्रॅक्टर (रु.450/- ), तीन चाकी (रु.500/-), इतर सर्व वाहने ( रु. 745/-) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या वाहनावर HSRP नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्ययावत करणे इ. कामकाज थांबविण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी. HSRP नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट HSRP  नंबर प्लेट असलेली वाहनांवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.