सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या यशात अनिरुद्ध देसाई यांचे महत्वाचे योगदान

आमदार नितेश राणे यांनी केलं कौतुक
Edited by: गुरुप्रसाद दळवी
Published on: August 27, 2022 20:26 PM
views 197  views

सिंधुदुर्गनगरी : अनिरुद्ध देसाई आणि सिंधुदुर्ग बँक हे एक समीकरण बनलेले होते. बँकेच्या यशात देसाई यांचे महत्वाचे योगदान आहे. देसाई नसते तर कदाचित एवढे पुरस्कार बँकेला मिळाले नसते, असे गौरवोदगार आमदार व बँकेचे संचालक नितेश राणे यांनी काढले. जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून अनिरुद्ध देसाई यांचा स्नेहसंवाद कार्यक्रम ओरोस येथे झाला. यावेळी बँकेचे चेअरमन मनीष दळवी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व अन्य बँकअधिकारी बँक कर्मचारी, मान्यवर उपस्थित होते.

कर्मचा-यांच्यावतीने व स्टाफ सोसायटी यांच्यावतीने देसाई यांचा सत्कार करण्यात. ज्या प्रकारे शेतक-यांना केद्रबिंदू ठेउन अनिरूध्द देसाई यांनी काम केलं, त्यामुळे बँकेच्या पुरस्कारांच्या यादीत बँकेचा नावलौकीक वाढवला. त्यांनी ज्या प्रकारे संघर्ष करत स्वताला घडवले व आपले नांव बँकीक शेत्रात बिंबवले ते उल्लेखनिय असुन जिल्ह्याच्या सहकार शेत्रातील मान्यवरांच्या यादीत अनिरूध्द देसाई यांच नांव ठळकपणे घ्याव लागेलं. जसे तुम्ही यशस्वी झालात तसे मार्गदर्शन आम्हाला केले तर आम्हीही राजकारणात यशस्वी होऊ, असे नितेश राणे म्हणाले.

जिल्हा बँकेच्या वाटचालीतला महत्वाचा व भावनाविवश करणारा आजचा प्रसंग आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक राज्यात पहिल्या चारात गणली जाते, याचे श्रेय देसाई साहेबांना ही जातं. दिलेल्या जबाबदारीतून देसाई लौकिकाला साजेसे काम करतील, अशी खात्री आहे, असे यावेळी मनीष दळवी म्हणाले.