धनगर समाजाच्या आरक्षणा बाबत अंमलबजावणी करा..!

सकल धनगर समाज संघ देवगडची मागणी
Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 26, 2023 12:07 PM
views 118  views

देवगड : धनगरसमाज आरक्षण बाबत अंमलबजावणीची मुदत संपली असून महाराष्ट्र शासनाने धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ हाताळावा अन्यथा शासनाला  धनगर समाजाच्या संविधानिक मार्गाने तीव्र लढ्याला सामोरे जावे लागेल,असा इशारा सकल धनगर समाज संघ देवगडच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे देवगडचे नायब तहसीलदार यांचे मार्फत देण्यात आला आहे.

या निवेदनात नमूद केले प्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुमारे अडीच ते तीन कोटी धनगर समाज असून डोंगरदऱ्यात राहणारे, भटकंती करून उपजीविका भागवणारी समाज बांधव, आज विकासापासून वंचित आहे .कित्येक पिढ्याने मागासपर्यंत मागासलेपणाची झळ सोसली असून भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान दिले आहे.

गेल्या ७० वर्षांमध्ये सर्वच शासनाने आरक्षण अंमलबजावणी पासून फारकत घेतली आहे.या संदर्भात धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आमरण उपोषण केले जिल्ह्यापासून ते गाव खेड्यापर्यंत आंदोलनाचे लोन पसरले असून या अनुषंगाने धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठीचे पुरावे एका विशेष बैठकीची मांडण्यात आले व त्या अनुषंगाने आवश्यक त्या योजनांच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देवगड तहसीलदार यांचे मार्फत सकल धनगर समाज संघ देवगड तालुक्याच्या वतीने शुक्रवारी सकाळी सादर करण्यात आले आहे . यात नमूद केल्याप्रमाणे धनगर समाजाच्या उद्धारासाठी यात आठ योजनांची मागणी करण्यात आली आहे.