
सावंतवाडी : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका येथील कार्यालयाजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना मध्यप्रदेश व गोवा मडगाव येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आज सकाळी ६.१५ वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल ५० लाख ५२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. कुदन (वय २६) मध्य प्रदेश व टोनी मोरोइएस (वय ४८) रा.मडगाव असे ताब्यात घेणाऱ्या संशयत आरोपीचे नाव आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे.