
सावंतवाडी : पत्रादेवी - बांदा रोडवरील एका धाब्याजवळ अवैधरित्या दारूची वाहतूक करताना एकावर कारवाई करण्यात आली. यात तब्बल 16 लाख 20 हजार 840 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी वाहन चालक शुभम शितोळे (वय 27) रा. सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.