जि. प. शाळेत घेतलं प्राथमिक शिक्षण

तळकटच्या मानस राऊळची आकाशाला गवसणी
Edited by:
Published on: July 17, 2025 21:02 PM
views 51  views

दोडामार्ग : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळकट नंबर दोन या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेला मानस मणिपाल राऊळ याने  I.I.T.ला गवसणी घातली आहे. देशातील सर्वात कठीण समजला जाणाऱ्या JEE ॲडव्हान्स परीक्षेत त्याने यश मिळवले. आपल्या जिल्ह्यात दहावी परीक्षेत नव्वद आणि नव्वद पेक्षा जास्त टक्के घेणारी कमीतकमी शंभर मूल असतात, पण बारावी नंतर NEET, JEE, MHCET अशा व्यावसायिक अभ्यासक्रमात मेरिट मध्ये येणारी ही मानस सारखी हाताच्या बोटावर मोजण्या एवढी कमी मूल असतात. जिल्ह्यात सुद्धा दरवर्षी एखाद दुसरा विद्यार्थी असतो जो IIT ADVANCED मेरिट मध्ये पास होतो.

म्हणून मानस चे हे यश उल्लेखनीय आणि अभिमानास्पद आहे. डोंगराळ समजल्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या टोकाला असणाऱ्या दोडामार्ग मधून यावर्षी दोन मुलांची निवड झाली. दरवर्षी या परीक्षेसाठी 16 ते 17 लाख मुले JEE मेन्स परीक्षेसाठी बसतात. या परीक्षेतून केवळ अडीच लाख मुले JEE ॲडव्हान्स साठी निवडण्यात येतात आणि इथून केवळ पंधरा हजार मुलांची निवड I.I.T. साठी होत असते.

पहिली ते  चौथी पर्यंतचे शिक्षण तळकट येथे पूर्ण झाल्यानंतर नवोदय परीक्षेची तयारी करून नवोदय ला निवड.दहावीपर्यंत शिक्षण नवोदय विद्यालय सांगेली येथे पूर्ण करून सी.बी.एस.ई.बोर्ड ला 97%  मार्क मिळवले सी.बी.एस.ई.बारावी साठी खेड येथील रोटरी क्लब या संस्थेतून 90%गुणांनी बारावी उत्तीर्ण. हे करत असतानाच त्याने जे ई.ई मेन्स या परीक्षेची तयारी केली या परीक्षेत त्याला 99 परसेंटाइल गुण मिळाले त्यानंतर JEE ॲडव्हान्स ची  जोरदार तयारी केली. त्यामुळेच त्याचे देशातील नामांकित अशा आयआयटी संस्थेत सिलेक्शन झाले पंजाब मधील रोपड या ठिकाणी असणाऱ्या आय.आय.टी. कॉलेजमध्ये त्याने मेकॅनिकल या शाखेत प्रवेश घेतला आहे.

आता पुढील चार वर्ष तो पंजाब मधील आयआयटीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करणार आहे. आपल्याजवळ कष्ट करण्याची तयारी जिद्द, चिकाटी असेल तर आपण कोणतेही यश प्राप्त करू शकतो यासाठी दिवसातून कमीत कमी 12 ते 13 तास तो अभ्यास करत होता. हे करत असताना त्याच्या आई-वडिलांचे,मामाचे मार्गदर्शनआपल्या प्राथमिक शाळेतील साबळे बाई यांनी दिलेला मोलाचा संदेश ` सतत वाचन करत रहा` तो कधीच विसरू शकत नाही असेही तो म्हणतो.आपल्या आजोबांनी लहानपणापासून सांगितलेल्या कथा, गाणी यामुळेही आपल्याला शिक्षणाची आवड निर्माण झाली असे त्याचे म्हणणे आहे. यापुढेही चार वर्ष मेहनत करून इंजिनिअरिंग पूर्ण करून आपल्या आई वडील तसेच आपल्या तालुक्याचे नाव उज्वल करण्याचा त्याचा मानस आहे.