
चिपळूण : जीवनामध्ये विनम्र झाल्यास जगही जिंकता येते" , मात्र "जिंकल्यानंतर आवरता आले पाहिजे आणि हरल्यानंतर सावरता आले पाहिजे" असे प्रतिपादन देवरुख संगमेश्वर पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी शशिकांत त्रिभुवने यांनी केले. शुक्रवार २७ डिसेंबर रोजी , अलोरे येथील मो.आ.आगवेकर माध्य.विद्यालय आणि सीए वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते देवी सरस्वती मूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक करताना ते पुढे म्हणाले की, बौद्धिक शिक्षणाबरोबरच आईवडील व गुरुप्रती आदरभाव असावा. संस्कार आणि शिक्षण शाळेतच मिळते". त्यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा उंचावलेला आलेख विद्यार्थ्याना प्रोत्साहित करणारा होता. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्याना मोबाइलकचा गैरवापर करू नका, पारंपरिक खेळ खेळा, असे सुचवत, कमवा आणी शिका या संकल्पनेवर भर दिला. शाळेतील आपल्या बालपणीच्या गंमतीदार शिक्षेच्या आठवणी सांगितल्या. ' यावेळी बोलताना ते म्हणाले, 'अलोऱ्यात आलेला माणूस, अलोऱ्याला कधी ही विसरू शकत नाही.' अशी कृतज्ञता त्यांनी अलोरे गांव आणि आपल्या शिक्षकांविषयी व्यक्त केली.
शुक्रवार दि. २७ व शनिवार दि. २८ असे दोन दिवस पार पडलेल्या इयत्ता पाचवी ते बारावी तील विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात नटराज आराधना, कोळीगीत, देशभक्तिपर गीत, जाखडी नृत्य, रीमिक्स, शेतकरी आणी कोंकणी नृत्य, गोवा संस्कृति नृत्य आणि गोरा कुंभार ही नृत्य नाटिका सादर झाली.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन पराग भावे, संस्था समन्वयक अरुण माने, मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, पर्यवेक्षिका श्रीमती गमरे, प्राथ. विभाग मुख्याध्यापिका सौ. लांजेकर, शिशुविहार प्रमुख सौ. मोहिते, शिक्षक, पालक आणी विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.