या पुढेही कणकवली महोत्सव बघायचा तर पुन्हा एकदा राणे यांच्या हाती सत्ता द्या !

आमदार नितेश राणे यांचा कणकवलीकरांना शब्द !
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 09, 2023 11:47 AM
views 291  views

कणकवली : आपल्याला पुढच्या वर्षीही कणकवली महोत्सव बघायचा असेल तर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हाती सत्ता आली पाहिजे. तर पुढच्या वर्षीही वेगळ्या पद्धतीचा महोत्सव याठिकाणी साजरा करू. असा शब्द आमदार नितेश राणेंनी कणकवलीकरांना दिला. कणकवली पर्यटन महोत्सवात ते बोलत होते. 

ते म्हणाले,  राजकीय भाषण देऊन तुमच्यामध्ये आणि या कलाकारांमध्ये जास्त वेळ आम्हाला घ्यायचा नाही. पण कणकवली महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही जे काही आपल्यासाठी करू शकलो, जो काही भव्य दिव्य कार्यक्रम आपल्यासाठी आणू शकलो, हे फक्त आमच्या कणकवलीकरांमुळेच आहे. कारण तुम्ही आम्हाला पाच वर्ष अगोदर आशीर्वाद देऊन कणकवलीची धुरा आमच्या हातात दिला. ते जर दिल नसता तर तुम्हाला आम्ही आजचा क्षण देऊ शकलो नसतो. निवडणुकीच्या निमित्ताने एक वेगळा इतिहास घडवला. आपल्यासमोर मतदानाच्या निमित्ताने निवडणूकीत कणकवलीकरांनी दाखवून दिली.

ते म्हणाले, कणकवलीकरांनी जो विश्वास आमच्यावर टाकला, त्या विश्वासासाठी आम्ही सगळेजण दिवस रात्र मेहनत करू. आज आपल्यासमोर शिंदे फडणवीस सरकारकडून तब्बल २२ कोटी आमच्या कणकवलीकरांसाठी विकास निधी आणून दाखवलेला. नगराध्यक्ष आणि पूर्ण टीम गप्प बसली नाही. सातत्याने आपली सेवा करण्याची आम्ही प्रयत्न केलेला आहे. जे शब्द आपल्याला दिले ते सगळे शब्द आम्ही पाच वर्षांमध्ये पूर्ण करून दाखवले. 

हा उत्साह असाच दरवर्षी आपल्याला आम्ही देऊ. आपल्या सेवेत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आलेल्या सगळ्या कलाकारांना ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या लोकांनी आम्हाला हा महोत्सव घेण्यासाठी मदत केली आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आम. नितेश राणे यांनी आभार मानले. परत आपल्याला पुढच्या वर्षी कणकवली महोत्सव बघायचा असेल तर पून्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हाती सत्ता आली पाहिजे तर पुढच्या वरही वेगळ्या पद्धतीचा महोत्सव याठिकाणी साजरा करू. असा शब्द देखील आमदार नितेश राणेंनी कणकवलीकरांना दिला.