
देवगड : वाहनावर कुठल्याही प्रकारचे चलन काढले गेल्या बाबत फेक मेसेज आल्यास पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर तसेच वाहतूक पोलीस प्रवीण सावंत यांनी केले आहे. देवगड तालुक्यात तुमच्या वाहनाचे ट्रॅफिक तिकीट जारी केले आहे.पुरावे आमच्या सीसीटीव्ही कॅमेरा टिपले आहे. अशा आशयाचे संदेश उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या नावे आर्थिकफसवणुकीचे पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात असल्यामुळे वाहन चालक हैराण झाले आहेत.या मेसेजची शहानिशा करावी त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी असे आवाहन देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर तसेच वाहतूक पोलीस प्रवीण सावंत यांनी केले आहे.
पाठवण्यात येणाऱ्या संदेश मध्ये असे म्हटले आहे की,आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की तुमच्या वाहनासाठी ट्रॅफिक तिकीट (No.MH46894230933070073) जारी केले आहे. हे पुरावे आमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहेत.ही चूक आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, आम्ही तुम्हाला खालील लिंक वापरून वाहन परिवहन ॲप डाउनलोड करण्यास प्रोत्साहित करतो. हे तुम्हाला पुराव्याचे कसून पुनरावलोकन करण्यास आणि कोणत्याही विसंगतीची तक्रार करण्यास सक्षम करेल.[वाहन परिवहन ॲप डाउनलोड करा
तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. असा उल्लेख करण्यात आलेला आहे. या मेसेज बाबत देवगडचे वाहतूक पोलीस प्रवीण सावंत यांना विचारणा केली असता तुमच्या गाडीवर कुठल्याही प्रकारचे चलन काढले गेल्याचे मशीन यंत्रणेमध्ये दिसत नाही असे फेक मेसेज येऊन जिल्ह्यातील नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे दिसून येतात त्यांनी वाहन चालकांना आवाहन केले आहे की,असे फेक मेसेज आल्यास प्रथम जवळच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा त्यानंतरच पुढील कारवाई करावी असे आवाहन देखील देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर तसेच वाहतूक पोलीस प्रवीण सावंत यांनी केले आहे.
तसेच मिठबाव येथील सुभाष धोंडू शिरवाडकर यांना देखील असाच मेसेज येऊन तुमची गाडी मुंबई येथे स्पीड लिमिट क्रॉस केल्यामुळे दोन हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे दंड वसुलीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमार्फत आपणास नोटीस नोटीसही बजावल्याचा दावा शिरवाडकर यांनी केला आहे. एकंदरीत या फेक मेसेज मुळे वाहन चालक हैराण झाले असून या घटनेबाबत वाहन चालकांनी घाबरून न जाता नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन वादेवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर तसेच वाहतूक पोलीस प्रवीण सावंत यांनी केले आहे.