मंत्री केसरकरांवर टीका केल्यास जशास तसं उत्तर देऊ | बबन साळगावकर कोणत्या राष्ट्रवादीत हे जाहीर करावं : प्रतिक बांदेकर

Edited by: विनायक गावस
Published on: July 12, 2023 14:44 PM
views 150  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नावावर मिळालेलं नगराध्यक्षपद ७ वर्ष उपभोगल नंतर जनमताचा अनादर करून बबन साळगावकर यांनी राजीनामा दिला होता. भांग कोण पित ? हे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना ठाऊक आहे. दीपक केसरकर हे राज्याचे शिक्षणमंत्री आहेत. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून बबन साळगावकर यांनी भान ठेवून बोलावं. पहिल्यांदा आपल्याला आंदण म्हणून मिळालेल्या नगराध्यक्ष पदाच्या काळात कोणते उल्लेखनीय काम केल ते जनतेला सांगावे. नंतरच कार्यसम्राट मंत्री दीपाक केसरकर यांच्यावर टीका करावी. तर शिवसेनेत आपण प्रवेश केला नाही असं सांगणाऱ्या बबन साळगावकर यांनी आता कोणत्या राष्ट्रवादीत आहेत ? हे देखिल त्यांनी जाहीर करावं. यापुढे दीपक केसरकरांवर टीका झाली तर जसाच तसं उत्तर दिलं जाईल आसा इशारा युवासेना शहर प्रमुख प्रतीक बांदेकर यांनी दिला.